पुणे महाराष्ट्र

पुण्यातील पुरामागे मानवनिर्मित कारणं- सचिन शिर्के

पुणे |  महानगरपालिका हद्दीतील सर्व बांधकामं नगरविकास खात्याच्या नियमांनुसार बांधणं, ग्रामपंचायतीकडून परवानगी घेऊन बांधकाम करणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी पाचवर्षाचे नियोजन करण्याची मानसिकता बदलून पुढील 50 वर्षाचा आराखडा तयाक करायला हवा, असं मत जलसंपदा विभागाचे माजी मुख्य सचिव सुरेश शिर्के यांनी व्यक्त केलं आहे.

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामागे मानवनिर्मित कारणे आहेत. ग्रीन झोनवरील तीस नाले बुजवले गेल्याने सापडत नाहीत. मौलाना आझाद सोसायटी मैदानावर भराव टाकल्याने ओढा अरूंद झालेला आहे, असंही शिर्केंनी स्पष्ट केलं आहे.

ग्रीन झोनमधील अतिक्रमणे आणि चुकीची बांधकामे त्यामुळे नाल्याचा मार्ग अनेक ठिकाणी वळविण्यात आला आहे. ट्रेझर पार्क, गुरूराज सोसायटी या ठिकाणी इंग्रजी टी आकारातच प्रवाह वळविल्यानं नुकसान झालं आहे, असंही शिर्के यांनी सांगितलं आहे.

आंबिल ओढ्याला 36 नाले येऊन मिळतात. त्यापैकी 30 नाले गायब झाले आहेत. अध्यापक सोसायटीत येणारा आणि टांगेवाला काॅलनीत आंबिल ओढ्याला मिळणाऱ्या नाल्यावर याळगी दत्त मंदिर, विद्याविकास शाळा उभारली आहे, अशा पद्धतीने नाले गायब झाल्यानं पाणी रस्तावरूनच वाहत आहे. त्यामुळे पाणी मुरण्याची प्रक्रिया बंद झाली आहे, असं शिर्के यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्तवाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या