Murder l अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) एका 53 वर्षीय प्रियकराने आपल्या 28 वर्षीय प्रेयसीचा कोयत्याने वार करून खून केला. खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांत हजर झाला. मृत तरुणीचे नाव सोनाली राजू जाधव (Sonali Raju Jadhav) असून ती पोखरी (Pokhari), ता. आंबेगाव (जि. पुणे) (Pune) येथील रहिवासी आहे.
आरोपी सखाराम धोंडीबा वालकोळी (Sakharam Dhondiba Walkoli) (रा. निरगुडसर (Nirgudsar), ता. आंबेगाव) याने राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) वांबोरी (Vambori) शिवारात हे कृत्य केले.
खून करण्याचे कारण :
सोनालीचा पती एका गुन्ह्यात सात वर्षे तुरुंगात होता. दरम्यान, तिची वालकोळीशी ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळ ते एकत्र राहिले. मात्र, नंतर सोनालीचा पती तुरुंगातून सुटल्यावर ती पतीकडे परत गेली. काही दिवसांनी तिने वालकोळीला पैशांसाठी धमकावणे सुरू केले. ‘पैसे दे, नाहीतर तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करीन,’ अशी धमकी ती देत होती.
Murder l असा घडला प्रकार :
या धमक्यांना वैतागलेल्या वालकोळीने सोनालीला अहिल्यानगरला बोलावले आणि वांबोरीला नेऊन तिचा कोयत्याने वार करून खून केला. या हल्ल्यात तिचे शीर धडावेगळे झाले.