‘जय श्री राम’ म्हणण्याची जबरदस्ती, वृद्ध भिकाऱ्याला मारहाण

जोधपूर | जय श्रीराम म्हणण्यासाठी वृद्ध भिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या सिरोही भागात घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी विनय कुमार मीना या तरुणाला अटक केलीय. 

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विनय कुमारने भिकारी मोहम्मद सलिमला मारहाण केली. व्हिडिओमध्ये तो भिकाऱ्याला जबदस्ती जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडत असल्याचं दिसतंय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विनय कुमार फरार झाला. त्याने नंतर माफी मागणारा व्हिडिओही तयार केला होता. 

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आलीय. 

पाहा व्हिडिओ-