बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलंच! लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी पठ्ठ्याने पळवली बस, अन्….

तिरुवनंतपुरम | केरळमधील एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. दिनूप नावाच्या एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी चक्क एका बसची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिनूपने कोझिकोडच्या बसस्थानकावर उभी असलेली एक खाजगी बस शनिवारी चोरली. त्यानंतर रात्रभर बस चालवत राहिला. दिनूपने कुटुंबाची भेट घेण्यासाठी चार जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्या आणि आपल्या जिल्ह्यात पोहोचला. मात्र घरी पोहोचण्या आधीच पोलिसांनी त्याला पकडलं.

दिनूपला अटक करुन चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. पथनमथिट्टा जिल्ह्याच्या तिरुवल्लामध्ये राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी आपण जात असल्याचं दिनूपने पोलिसांना सांगितलं.

कोझिकोडवरुन 270 किलोमीटर लांब असलेल्या तिरुवला येथे पोहोचता येत नव्हते. त्याला कुट्टियाडी पोलीस स्टेशन परिसरात एक खाजगी बस दिसली. ज्यामध्ये कोणी नव्हतं. त्यानंतर दिनूप बसमध्ये घुसला आणि तिरुवल्ला येथे जाण्यासाठी निघाला. दिनूपने मल्लापूरम, त्रिसूर, एर्नाकुलम हे जिल्हे पार करुन कोट्ट्याम जिल्ह्यात प्रवेश केला. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवणं पूनावालांना फायद्याचं की तोट्याचं?; पूनावाला म्हणाले…

गडकरींची कमाल! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण

महत्त्वाची बातमी! लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More