मुंबई | आपल्या आक्रमक भाषणांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप-मोदी-शहांना सळो की पळो करून सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षात इनकमिंग वाढल्याचं चित्र आहे.
आगामी विधानसभेच्या तयारीसाठी उमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांनी शनिवारी मनसेत प्रवेश केला आहे.
ठाणे-पालघर या भागातील विविध पक्षातील कार्यकर्तेसुद्धा ‘कृष्णकुंज’वर मनसेत दाखल झाले आहेत. उल्हासनगर-अंबरनाथ, वसई-विरार या भागातल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मनसेत प्रवेश केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय पण विधानसभेसाठी मात्र संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक जिंकायची असेल तर तडजोडी कराव्या लागतात- नितीन गडकरी
-आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात, विदर्भात राज ठाकरेंची एक तरी सभा घ्या…!
-पक्ष सोडून गेलेल्यांना राष्ट्रवादीची दारे कायमची बंद- अजित पवार
‘-…म्हणून शिवसैनिकांनी भर प्रचार रॅलीतच ‘चौकीदार चोर है’ च्या जोरदार घोषणा दिल्या!’
-पुण्याच्या चारही जागा जिंकू; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
Comments are closed.