संजय निरूपमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मनसेची आक्रमक पोस्टरबाजी

मुंबई | उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं होतं. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

संजय निरुपम हा परप्रांतीय भटका कुत्रा अाहे. परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून तो अशी विधाने करत आहे, अशी आक्रमक पोस्टरबाजी मनसे सोशल मीडियावर केली आहे.

जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही, असं निरूपम यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता मनसेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राम मंदीर उभारणीतील खरा अडथळा मोदी; प्रवीण तोगडियांचा हल्लाबोल

-फिटनेससाठी कायपण! विराट कोहलीनं या आवडत्या गोष्टींचा केला त्याग!!!

-युती तुटली तर आमच्यापेक्षा शिवसेनेला मोठा फटका बसेल- मुख्यमंत्री

-पतंग उडवण्याच्या मांजामुळे 26 वर्षीय डॉक्टरचा गळा चिरून मृत्यू

-मीच असणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा