बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेवर ‘या’ फोटोमुळे सोशल मीडियातून होतोय कौतुकाचा वर्षाव!

इंदौर | कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांमधील 60 वर्ष वयाच्या व्यक्ती आणि 45 वर्षांहून मोठ्या असलेल्या गंभीर रोगांनी पिडीत असलेल्या व्यक्तींचं लसीकरण अभियान 1 मार्चपासून सुरू झालं आहे. अशात सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंदोरच्या प्रफुल्ल चौरसिया उर्फ आशू पटेल यांनी काढलेला हा फोटो आहे. हा फोटो आशू यांनी इंदोरच्या खंडवा रोड इथं काढल्याचं कळतंय. या फोटोमध्ये एक तरुणी आपल्या दोन्ही हातांना धरून दोन वृद्ध महिलांना रस्त्यावरून नेत असल्याचं सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. यामुळे मानसीचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे.

या तरुणीचं नाव मानसी आहे. मानसी आपल्या 68 वर्षीय सासूबाई वसंती अकोलेकर आणि 93 वर्षीय आजेसासू विमल अकोलेकर यांना लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रात घेऊन आल्या होत्या. त्यावेळी आशू पटेल यांनी हा फोटो काढलाय.

या फोटोला आशू पटेल यांनी , ‘जिंदगी का डोस’, असं कॅप्शन दिलं आहे. तसेच लस घेतल्यानंतर काही एडव्हर्स इफेक्ट्स जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे सिनियर सिटिझन्सला लस दिल्यानंतर सुदृढ व्यक्तीच्या सोबतीची गरज लागते.

थोडक्यात बातम्या-

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही”

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?

मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या भाषणातील राज्यातील 3 महत्वाचे मुद्दे व प्रश्न सांगा आणि बक्षीस मिळवा!

ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार- पंकजा मुंडे

#उद्धव_माफी_माँगों ट्विटरवर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड? जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More