बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मॅंचेस्टर युनायटेडची आयपीएलमध्ये एन्ट्री; ‘हा’ संघ विकत घेण्याची शक्यता

नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची गणना होते. आयपीएलचा 14 वा हंगाम नूकताच संपला आहे. कोरोना, खेळाडूंची दुखापत अशा अनेक संकटांना मात देत आयपीएलचं युएईमध्ये यशस्वी आयोजन झालं आहे. आता आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी दोन नव्या संघांची निवड बीसीसीआय करणार आहे.

नवीन संघासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत. जगातील प्रसिद्ध फुटबाॅल क्लब मॅंचेस्टर युनायटेडनं आयपीएलचा संघ विकत घेण्यासाठी रस दाखवला आहे. मॅंचेस्टर युनायटेड संघाचे मालक ग्लेसर कुटुंबानं आयपीएलचा संघ विकत घेण्यासाठी कागदपत्रे मागवली आहेत, अशी माहिती समोर येत आहे. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ असण्याची शक्यता आहे. या दोन संघापैकी एक संघ विकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आतापर्यंत आपण मॅंचेस्टर युनायटेड संघाला फुटबाॅल खेळाचं प्रतिनिधीत्व करताना पाहिलंय. ख्रिस्तियानो रोनाल्डो या सर्वकालिन महान फुटबाॅल खेळाडूमुळं मॅंचेस्टरच्या चाहत्यांची संख्या जगभर आहे. परिणामी मॅंचेस्टर समूह जर आयपीएलमध्ये उतरला तर आयपीएलमध्ये उतरणारी पहिला विदेशी फाँन्चायजी ठरणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयनं नविन संघासाठी 2000 कोटी रुपये बेस प्राईज ठेवली आहे. एवढी मोठी बेस प्राईज ठेवूनही तब्बल 12 विविध ग्रुपनी संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. बीसीसीआय लवकरच नविन संघाची घोषणा करणार आहे.

थोडक्यात बातम्या 

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More