महाराष्ट्र मुंबई

गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाआधीच आमदार मंदा म्हात्रे आक्रमक!

नवी मुंबई | गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत, अशी जोरदार टीका भाजप आमदार मंदा म्हात्रे गणेश नाईक यांच्यावर केली आहे. त्यांना भाजपबद्दल आपुलकी नाही, अशी टीका करत बेलापूरमधून पुन्हा एकदा मलाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबईच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणारे गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याचं कळतंय. मात्र त्यांच्या भाजपप्रवेशाच्या अगोदरच मंदा म्हात्रे नाराज आहेत.

गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश ही निव्वळ स्टंटबाजी आहे. पक्षश्रेष्ठी मला योग्य तो न्याय देतील, असं म्हात्रे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, नवी मुंबई आणि ठाणे भागात गणेश नाईक यांचं मोठं नाव आहे. त्यांचा भाजपप्रवेश हा राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का मानण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पदभार स्विकारल्याक्षणी राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षा सरकारविरोधात आक्रमक!

संसदेत दुष्काळावर भाषण अन् विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी!

-नारायण राणे भाजप खासदारकीचा राजीनामा देणार??? उचलणार मोठं पाऊल

मलायका म्हणते… ‘कबूल किया मैंने उसको और उसके प्यार को!’

फारूख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच पण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या