Top News खेळ

‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक

दुबई | कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पंजाबने 8 विकेट्स राखत दणदणीत विजय मिळवला. यामध्ये मनदीप सिंगच्या 66 रन्सच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा ठरला. मनदीपने ही खेळी त्यांच्या वडिलांना समर्पित केलीये.

मनदीप म्हणाला, ही खेळी माझ्यासाठी अत्यंत खास आहे. माझे बाबा मला नेहमी प्रत्येक सामन्यात नाबाद राहण्यास सांगायचे. त्यामुळे ही खेळी खरोखरच माझ्यासाठी विशेष आहे. ते अनेकदा मला सांगायचे 100 किंवा 200 धावसंख्या असो तू नाबाद राहायला हवंस.

केकेआर विरूद्धच्या सामन्याआधी मी राहुलबरोबर बोललो होतो. गेल्या सामन्यात मी वेगाने धावा करण्याच्या नादात बाद झालो. राहुलने मला तुझा नॉर्मल गेम खेळलास तर मी सामना जिंकून देऊ शकतोस असं सांगितलं.

आयपीएलला रवाना होण्यापूर्वी मनदीपच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. आजारपणामुळे त्यांचं 23 ऑक्टोबर रोजी निधन झालं. तरी मनदीप दुसऱ्याच दिवशी सर्व दुःख बाजूला सारत स्वतःचं कर्वव्य बजावण्यासाठी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

…मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

…तर उपसभापतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार- अशोक चव्हाण

शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे

“उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या