Top News खेळ शेती

…म्हणून क्रिकेटपटू मनदीप सिंह शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाला सहभागी

नवी दिल्ली | कृषी कायद्यांविरोधात पंजाब तसंच हरियाणातील शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत गेल्या अनेक दिववसांपासून आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला अनेक खेळाडूंनी पाठिंबा दिलाय.

तर पंजाबच्या क्रिकेट संघाचा खेळाडू मनदीप सिंहने आपला पाठिंबा दर्शवलाय. मनदीपने मंगळवारी दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर जाऊन शेतकरी आंदोलनात एक दिवस घालवलाय.

यानंतर मनदीपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्व काही लवकर ठीक होऊ दे, असं म्हणत प्रार्थना केलीये. यासोबत त्याने ‘नो फार्मर नो फूड’ असा हॅशटॅग देखील दिला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना मनदीप म्हणाला, “दिल्लीत सध्या शेतकरी ज्या पद्धतीने आंदोलन करतायत ते पाहून मला राहवत नाही. म्हणूनच मी माझा पाठींबा दर्शवण्यासाठी एक दिवस त्यांच्यामध्ये सहभागी झालो.”

थोडक्यात बातम्या-

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

“मुंबईच्या ‘या’ रुग्णालयात केला जाणार कोरोना लसीकरणाचा पहिला प्रयोग”

पृथ्वीवर एलियन्स लपले आहेत; इस्त्राईलच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या