सहमतीशिवाय कास्टिंग काऊच होऊच शकत नाही!

मुंबई | सहमतीशिवाय कास्टिंग काऊच होऊच शकत नाही, असं अभिनेत्री मंदिरा बेदीनं म्हटलंय. तिच्या या वक्तव्यामुळे सिनेसृष्टीमध्ये एकच खळबळ उडालीय. 

टाळी एका हाताने वाजत नसते. कोणीच कुणाला जबरदस्ती करत नसतं. त्यामुळे एका व्यक्तीला दोषी धरणं चुकीचं आहे. दुसरी व्यक्तीही तितकीच जबाबादार असते, असं मंदिरा बेदीनं म्हटलंय.

मी गेल्या 23 वर्षापासून सिनेसृष्टीत आहे. मला कुणी अशी ऑफर द्यावी, अशी परिस्थिती माझ्यावर कधीच ओढवली नाही. समोरचा व्यक्ती तडजोड करायला तयार असतो, तेव्हाच कास्टिंग काऊच होतं, असंही तिनं सांगितलं.