बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता काय प्यायची तेवढी प्या! दारुवर मिळणार बक्कल सूट

भोपाळ | देशभरात लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, पण असं असलं तरी अजूनही बरेच लोक आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही. आता अशाच लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

मध्य प्रदेश येथील मंदसौर जिल्ह्यात महालसीकरण मोहीम आयोजित केली जात आहे. नागरिक लस घेण्यासाठी प्रवृत्त व्हावे आणि ही महालसीकरण मोहिम यशस्वी व्हावी यासाठी मंदसौर प्रशासनाने एक भन्नाट युक्ती लढवली आहे. नागरिकांना दारूवर चक्क 10 टक्के सूट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, मात्र त्यासाठी एक अट देखील घालण्यात आली आहे.

दारू हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे जर दारूवर सूट पाहिजे असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला दोन्ही डोस घेतले असल्याचं प्रमाणपत्र दारूच्या दुकानात दाखवावं लागणार असल्याचा आदेश जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. ( Discount On Liquor For Fully Vaccinated People )

नागरिकांनी लस घ्यावी यासाठी प्रशासनाकडून अजब गजब कल्पना लढवल्या जात आहेत. तर मंदसौर येथे राबवण्यात येणारी महालसीकरण मोहीम सफल व्हावी यासाठी दारूवर 10 टक्के सुट जाहीर करण्यात आली आहे, ज्याचा लाभ फक्त लसवंतांनाच होणार आहे. तर मंदसौर जुने बस स्थानक, भुनिया खेडी आणि शहरातील फाटक या ठिकाणी असलेल्या दुकानांत या ऑफरची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार?, टास्क फोर्सने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

आता विद्यार्थ्यांना महानगरपालिका देणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर

सर्वात मोठी घडामोड! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदार जिल्हाध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

काय सांगता! आता चक्क रेल्वेच मिळणार भाड्याने; रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली ‘ही’ नवी योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More