नाकात फिडिंग ट्यूब असतानाही मुख्यमंत्री पर्रिकरांकडून मांडवी पुलाची पाहणी

पणजी | मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असूनही गेल्या 11 महिन्यांपासून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप होत आहे. कित्येक महिन्यांच्या कालावधी नंतर आज नाकात फिडिंग ट्यूब असताना देखील मुख्यमंत्री पर्रिकरांनी पणजी येथील मांडवी पुलाची पाहणी केली.

सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन सोहळयावेळी मुख्यमंत्र्यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानावर मोर्चा देखील काढला होता.

14 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर गोव्यात परतले होते. तेथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरु आहेत.

दरम्यान, त्यांनी पर्वरीच्या बाजूने येत मेरशी पर्यंत पुलाच्या कामाची पाहणी केली. मांडवीचा तिसरा पुल हा पर्रिकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

 महत्वाच्या बातम्या –

विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती??? 

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती