अवनीला गोळ्या घालण्यात आल्यामुळे सुधीर मुनगंटीवार अडचणीत; मनेका गांधींची जोरदार टीका

नवी दिल्ली | अवनी वाघिणीच्या गोळ्या घालण्यात आल्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणी वाढल्या. त्यांच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. 

अवनीच्या अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे मला तीव्र दुःख झालं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी असे आदेश अनेकदा दिले आहेत. त्यांच्या आदेशानूसार करण्यात आलेली ही तिसरी वाघाची हत्या आहे, असं मनेका गांधी यांनी म्हटलं आहे. 

वाघिणीला बेशुद्घ करुन पकडणं शक्य होतं, मात्र तिला ठार करण्यात आलं. त्यासाठी गुन्हेरारी पार्श्वभूमी असलेल्या शार्प शूटरची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे. 

दरम्यान, आपण हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच मुनगंटीवारांच्या आदेशाविरोधात कायदेशीर तसेच राजकीय लढाई लढणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-उमेदवार भलेही कुख्यात गुन्हेगार असू दे पण जिंकणारा असावा!

-‘लोकपाल’ असता तर राफेलचं सत्य जनतेसमोर असतं-अण्णा हजारे

-शिवसेना दुतोंडी सापासारखी, बोलते एक आणि करते एक- प्रकाश आंबेडकर

-मनसेचे विभागप्रमुख कर्ण बाळा दुनबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

-अजित पवारांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या