Top News

तिकीट नाही दिलं तर शिवसेना द्यायला तयार; राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बंडाच्या तयारीत

पुणे |  पक्षातील आऊटगोईंग थांबवण्याचं राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान आहेच आहे मात्र आता ‘बंडोबांना थंडोबा’ करण्याचंही आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. कारण राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादीला सूचक इशारा दिला आहे.

लोकसभेवेळी राष्ट्रवादीने मला विधानसभा उमेदवारीचा शब्द दिला आहे. पण जर आयत्या वेळी मला तिकीट नाकारलं तर मला शिवसेना तिकीट द्यायला तयार असल्याचा मोठा गौप्यस्फोट बांदल यांनी केला आहे. ते ‘थोडक्यात’शी बोलत होते.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तश्या पद्धतीची माझी चर्चा झाली आहे. भाजपदेखील माझ्या उमेदवारीबाबत अनुकुलता दाखवली आहे, असंही बांदल यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात बांदल दंड थोपटण्याची शक्यता आहे. प्रदेश उपाध्यक्षच बंडाच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे. यंदाच्या वेळी काहीही झालं तरी मी विधानसभा लढणारच, असा निर्धार बांदल यांनी बोलून दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या