मुंबई | पुण्यातील एका सराफाकडे 50 कोटी रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पुणे पोलिस चौकशी करत आहेत. हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आलं आहे. याच प्रकरणी पक्षाने त्यांचं निलंबन केलेलं आहे. तशी घोषणा पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. (Mangaldas Bandal suspend NCP)
खंडणी प्रकरणी प्रसारमाध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. (Mangaldas Bandal suspends NCP)
कालच पोलिसांनी मंगलदास बांदल यांचा जबाल नोंदवला होता. पोलिस पुढचं पाऊल काय उचलणार यासंबंधी उत्सुकता असतानाच पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
खंडणीखोरांना या आधीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केलं आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार तसंच एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकारावर बांदल यांची बाजू आणखी समोर येऊ शकलेली नाहीये.
प्रसारमाध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलबिंत करण्यात येत आहे. pic.twitter.com/kB723WjBho
— NCP (@NCPspeaks) March 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांना दिलासा; 10 कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर
हनिमून झाल्यावर कळालं नवऱ्याला कोरोनाची लागण; पत्नी पळाली!
“काश्मिरची प्रगती करायची असेल तर राजकीय नेत्यांना नजरकैदेतून मुक्त करा; निवडणूक घ्या”
Comments are closed.