“शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले”

मुंबई | राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एक वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यात नव्या वादाला सुरूवात झालीये. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केलीये.

प्रभात लोढा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. ज्याप्रमाणे शिवराय आग्र्याहून सुटले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे बाहेर पडल्याचं त्यांनी म्हटलंय. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

लोढांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राज्यपालांची भाषा अनेक जण बोलत आहे. एकीकडे या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं. तुम्ही या गद्दारांची तुलना महाराजांशी करत आहात. हा तर महाराष्ट्राला कमी लेखण्याचा डाव असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणालेत.

अनेक जण राज्यपालांची भाषा बोलत आहे. यांचा महाराष्ट्र द्वेष सुरू आहे.  राज्यपाल ज्या पद्धतीने बोलले आहेत, त्यानंतर खोके सरकारने त्यांना परत पाठवायला पाहिजे होतं, मात्र त्याबद्दल कोणीच भूमिका घेताना दिसत नाही, मुख्यमंत्री शांत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-