पुणे | पुण्यातील एका सराफा व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून तसंच जीवे मारण्याची धमकी देऊन 50 कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणी राष्ट्रवादी प्रदेशचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलावून घेणार आहेत.
खंडणीचा प्रकार घडण्यापूर्वी मंगलदास बांदल सराफा व्यावसायिकाला भेटले होते. त्यामुळे घडलेल्या गुन्ह्यात बांदलाचा काही थेट संबंध आहे का? याची चौकशी पोलिस करणार आहेत.
खंडणीखोरांना या आधीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केलं आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार तसंच एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे.
दरम्यान, या साऱ्या प्रकारावर बांदल यांची बाजू आणखी समोर येऊ शकलेली नाहीये. आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
ट्रेंडींग बातम्या-
ना खडसे, ना काकडे भाजपकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या यादीत तिसऱ्याच नेत्याला तिकीट
सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणात एंट्री; केली मोठी घोषणा
महत्वाच्या बातम्या-
‘आडतास’ला उत्कृष्ट साहित्यकृतीचा राज्यस्तरीय पुरस्कार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय!
कोरोनामुळं जगभरातील ‘एवढे’ लोक दगावले!
Comments are closed.