Top News महाराष्ट्र मुंबई

संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार

रायगड | रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रानसई फार्म…. आंबा बागायतदाराचे नाव असीब शहाबाजकर… आंब्याचे चांगले उत्पादन होऊनही काेरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भलतचं संकट उभे राहिले.  यावर मात करण्यासाठी कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी एक शक्कल लढवली.  त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला, या ग्रुपचे नामकरण झाले ‘डायरेक्ट फ्रूट सप्लाय’.

या ग्रुप मध्ये त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्राहक यांचा समावेश करून घेतला आणि मग सुरू झाला आंब्याचा ऑनलाइन व्हॉट्सअप ग्रुप द्वारे व्यवसाय.  या ग्रुपवरच मागणी नोंदविली जाते.  मागणीप्रमाणे वाशी, नवी मुंबई ,खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये असलेल्या ग्राहकांपर्यंत आंब्याच्या पेट्या पोहोचविल्या जातात. आंबे पोहोचविताना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायजर चा वापर हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात.

हे आंबे जसे आंबा बागायतदार असीब शहाबाजकर यांनी विक्रीस दिले, तसेच पाली येथील शेतकरी श्री. परांजपे यांनी 100 डझन आणि उरण येथील शेतकरी घनश्याम धर्मा पाटील यांनी 110 डझन आंबे या व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून विक्रीसाठी दिले. आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 5 हजार डझनापेक्षा जास्त आंबे विकण्यात आले आहेत.

सुरुवातीला काही डझन आंबे विकल्यानंतर या ग्रूपमधील डॉ.सतिश मोरे आणि अमोल मार्कंडे या सदस्यांनी सूचना केली की, आपण केलेल्या विक्रीतून एका डझनामागे फक्त दहा रुपये असे जमा करुन करोनाच्या या संकटात शासनाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देवू या. या कल्पनेचा अधिक विस्तार झाला आणि या ग्रुपने आतापर्यंत झालेल्या आंबे विक्री झाल्यानंतर पहिले दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी, नऊ हजार दोनशे रुपये जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी श्री. पांडुरंग शेळके, श्री. विजयकुमार साळवे यांच्या हस्ते सुपूर्द केले.

याचबरोबर बेलापूर महानगरपालिकेला औषधे-गोळ्या घेण्यासाठी दहा हजार रुपये, गरिबांना अन्न वाटप करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला दहा हजार रुपये तर उरणमधील आदिवासींना बियाणे खरेदी करून देण्यासाठी मदत म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या