बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! पिंपळाला लागलाय आंबा?, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर समोर आलं खरं कारण

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आपण पाहतो अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे बाजारात नवनवीन आंबे आले आहेत. मात्र अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एका पिंपळाच्या झाडाला आंबे लागले आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तराखंडचा असल्याचं समजत आहे.

पिंपळाच्या झाडाला आंबे आल्याने सर्वांना चमत्कार वाटत आहे  मात्र तसं काही नसून यामागचं खर कारण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात वादळ आलं होतं. सोसाट्याचा वारा सुटल्यानं जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या काही फांद्या तुटल्या आणि त्या पिंपळाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकल्याची माहिती समजत आहे.

आंबे असलेल्या फांद्या अडकल्यामुळे सर्वांना असं वाटू लागलं की झाडालाच आंबे लागले आहेत. याचा कोणीतरी हा व्हिडीओ काढला आणि व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाचा व्हायरल झाला. मात्र व्हिडीओमध्ये एक होर्डिंग दिसत आहे. त्यावर ‘श्री गंगा सभा’ असं लिहिलं आहे.

दरम्यान, होर्डिंगवरील नंबरवर संपर्क करून पाहिला तर त्यांनी याबाबत माहिती देताना चुकीचा व्हिडीओ असल्याचं सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली- विनायक मेटे

लाखो रुपये नव्हे फक्त 10 रुपयात ‘हे’ डॅाक्टर दाम्पत्य करतंय कोरोनावर उपचार!

दिलासा देणारी बातमी; ‘या’ जिल्ह्यातील 260 गावं कोरोनामुक्त

‘… आणि हाच खरा राजधर्म आहे’; रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

मास्कच्या नावाखाली विकत होता स्टेशनरी; प्रशासनाने कारवाई केली अन् तो थेट गाडीखाली झोपला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More