Top News महाराष्ट्र

शरद पवारांच्या आदेशानंतर ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी!

Photo Courtesy - Facebook/Sharad Pawar

मुंबई | केरळमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. अशातच काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले पाला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे त्यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

रविवारी मणी सी कप्पन यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांना कारवाईचे आदेश दिले होते. मात्र तरीही त्यांनी पक्षविरोधी राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पक्षातून हकलून देण्यात आलं आहे.

मणी सी कप्पन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पाला मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि केरळचे परिवहन मंत्री ए के शशींद्रन यांनी दिली. पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे पक्षाचे प्रमुख सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पाला मतदारसंघाची पोट निवडणूक लढवून विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस नेते तथा यूडीएफचे उमेदवार जोश टॉम यांचा पराभव केला होता. पाला विधानसभेची पोट निवडणूक केरळ काँग्रेसचे प्रमुख के एम मणी यांचे निधन झाल्याने लागली होती.

 

थोडक्यात बातम्या-

“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार

‘पूजा चव्हणाची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य

मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या