विजयी भव:; झाशीच्या राणीची वीरश्री दाखवणारं गाणं, पाहा व्हीडिओ-

मुंबई | अवघ्या काही दिवसांवर ‘मनिकर्णिका- द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटाचं प्रदर्शन आलं आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटातील संगित अनावरणाचा सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी ‘विजयी भव’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात निस्वार्थ देशभक्ती आणि परकीयांबद्दल असणारा राग ठळक दिसत आहे. त्यामुळे विजयी भवच्या गाण्याला चांगलीच पसंत्ती मिळेल हे नक्की.

कंगना सोबतच तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता चित्रपट प्रेमींना लागली आहे.

दरम्यान, ‘विजयी भव’ हे गाणं प्रसून जोशी यांनी लिहलं असून शंकर-एहसान-लाॅय यांनी संगितबद्ध केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मंचावर होते काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे नेते; इंदूरीकर म्हणाले, मी सगळ्या पक्षांचा निष्ठावान!

-“मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो”

-आरक्षण दिलं, पण नोकऱ्यांचं काय, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

-आज सरकार विरोधात राष्ट्रवादीचा रायगडावरून तर काँग्रेसचा दिक्षाभूमीवरून यल्गार

-“बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी कायद्यांचं उल्लंघन”