नागपूर महाराष्ट्र

वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, आता मुलगी शिवसेना तर मुलगा भाजपच्या वाटेवर!

नंदुरबार | सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे बरेच नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत. अशात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबारच्या गडालाही सुरूंग लागला आहे.

गेली 52 वर्षे काँग्रेस खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या आणि नाशिकमधल्या इगतपुरीच्या विद्यमान आमदार निर्मला गावित शिवबंधनात अडकणार आहेत. त्यांनी 2014 ला शिवसेनेच्याच उमेदवाराचा पराभव केला.

माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित हे काँग्रेसकडून नंदुरबार जिल्हा परिषदे सदस्य आणि अडीच वर्ष अध्यक्ष राहिेले. ते आता भाजपच्या वाटेवर आहेत.

2014 च्या निवडणुकीत 9 वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव झाला त्यानंतर भरत यांनी 2019 ला लोकसभेचं तिकीट मागितलं होतं. मात्र ते दिल्यानं भरत बंडखोरीच्या तयारीत होते. त्यांचं बंड अखेर शमलं. आता मात्र गावित भाऊ-बहिण युतीत सामिल होण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या पक्षांतराने आता आघाडीला मोठा फटका बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-होय… मला प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच फोन करून सांगितलं होतं; नांदगावकरांचा गौप्यस्फोट

-“आतापर्यंत मनसेचं खळखट्ट्याक पाहिलं… आता शांततेची ताकद दाखवू”

-ईडीच्या नोटीसनंतर मनसेची पत्रकार परिषद; म्हणाले…

-10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा- प्रकाश आंबेडकर

-भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या