बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई |  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी तर राजु शेट्टी यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी आणि लोकसभेच्या पराभवाच्या चिंतनासाठी मुंबईत बैठक झाली. यावेळी ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘मनसे’ला सोबत घेण्यासाठी आघाडीचे काही नेते आग्रही असल्याची माहिती समोर आली होती.

आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही भेट वैयक्तिक होती, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दोन ठाकरेंच्या भेटीत (राज ठाकरे-माणिकराव ठाकरे) नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलं नाही.

महत्वाच्या बातम्या

-मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासाठी ‘ही’ नावं चर्चेत!

-बरेलीचे खासदार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

-गळा कापल्यानंतर डोकं ठेचून महिला पोलीस उपनिरीक्षकाची हत्या

-‘या’ राज्याचे मुख्यमंत्री एवढे कामात व्यस्त… की मोदींच्या शपथविधीला जाणार नाहीत

-मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More