इंफाळ | लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसअंतर्गत मोठ्या हालचाली घडत आहेत. मणिपूरच्या तब्बल 12 आमदारांनी मणिपूर काँग्रेस कमिटीत असलेल्या आपल्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे.
पक्षाकडे राजीनामा सोपवत आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अनुकरण करत आहोत. याशिवाय आमच्या राजीनाम्या मागे कोणतंही कारण नाही, असं आमदारांनी स्पष्ट केलं आहे.
पक्षाला बळकटी देण्यासाठी राहुल गांधींनी राजीनामा दिला. त्याचेच अनुकरण आमदार करत आहेत, असं मणिपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखमंग यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मणिपूरमधल्या 2 लोकसभेच्या जागांवर काँग्रेसचा पराभव झाला होता.
महत्वाच्या बातम्या
-मुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
-मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासाठी ‘ही’ नावं चर्चेत!
-बरेलीचे खासदार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
-गळा कापल्यानंतर डोकं ठेचून महिला पोलीस उपनिरीक्षकाची हत्या
-‘या’ राज्याचे मुख्यमंत्री एवढे कामात व्यस्त… की मोदींच्या शपथविधीला जाणार नाहीत
Comments are closed.