महाराष्ट्र मुंबई

…तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; ‘या’ मनसे नेत्याचा धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्माने मनसे नेते मनीष धुरी यांनाही फोन करुन, जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला. यानंतर या प्रकरणावर आता खुद्द मनीष धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनीष धुरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना रेणू शर्मावर गंभीर आरोप केले आहेत. जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता, असं मनीष धुरी यांनी म्हटलंय.

रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो, असं मनीष धुरी यांनी सांगितलं.

दरम्यान, मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं असं आहे, आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असं हेगडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मनसेच्या ‘या’ नेत्यालाही रेणू शर्मांचा फोन; कृष्णा हेगडेंचा खळबळजनक दावा

‘धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी’; रेणू शर्माच्या वकिलांचा गंभीर आरोप

“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग त्यांना लगेच फासावर चढवायचं का?”

“करुणा आणि रेणू शर्मा दोघीही एकाच घरात राहतात, मग मोठी बहीण का बोलत नाही?”

+आज त्यांनी मुंडेंना टार्गेट केलं, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो- कृष्णा हेगडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या