बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

नवी दिल्ली | ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवरती भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताच्या नकाशातील जम्मू-काश्मीर व लडाख हे प्रदेश वेगळे देश दाखवल्याने वादाला तोंड फुटलं होतं.

या प्रकरणात ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना दोषी धरून बुलंदशहरच्या बजरंग दलाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, भारतीय आयटी कायदा 2008 कलम 502 (2) व कलम 74 नुसार देशाचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीर व लडाख हे भारताचे अविभाज्य राज्य असून त्यांना वेगळे दाखवून ट्विटरला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? असा प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधी सोशल मीडियावर ट्विटरविरोधात अनेक टीका झाल्यानंतर ट्विटरने चुकीचा नकाशा आपल्या साइटवरून हटवण्याचा निर्णय घेतला.

गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार असा वाद होत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा प्रकाशित केल्याने आणखी एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही ट्विटरने अशीच चूक केली होती व लेह हा चीनचा भाग असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा केंद्र सरकारने ट्विटरला चांगलंच बजावलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटरने त्याच चुकीची पुनरावृत्ती केली आहे.

थोडक्यात बातम्या –

एका महिन्यात 16 वेळा इंधन दरवाढ; इंधनदरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका – एकनाथ खडसे

पोटनिवडणुकांबाबत ठाकरे सरकारचा निर्णय पक्का; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अखेर ट्विटरने हटवला भारताचा चुकीचा नकाशा; जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश दाखवल्याने पेटला वाद!

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More