नवी दिल्ली | माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा. ते खरे असतील तर मला अटक करा. जर भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाले तर दिल्लीच्या जनतेची माफी मागा, असं आव्हान दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्ली भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांना दिलं आहे.
मनोज तिवारी यांनी सिसोदिया यांच्यावर शिक्षण खात्यात 2 हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
माझ्यावरचा एकतरी आरोप तुम्ही सिद्ध केल्यास मी तुरूंगात जायला तयार आहे, असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आरोप सिद्ध न केल्यास आज सायंकाळपर्यंत दिल्लीच्या सर्व गरिबांची माफी मागा ज्यांना चांगल्या शाळा मिळाल्या आहेत, असं सिसोदिया म्हणाले आहेत.
Manish Sisodia: I want to challenge Manoj Tiwari & BJP, if an accused of Rs 2,000 cr scam is roaming free in Delhi, nothing can be more shameful for you. If Arvind Kejriwal & Manish Sisodia have committed scam, arrest them. Either arrest me by the evening, or apologise to public pic.twitter.com/fmXgXlHU9l
— ANI (@ANI) July 1, 2019
महत्वाच्या बातम्या-
-…तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; कृषीमंत्र्यांच शेतकऱ्यांना आश्वासन
-फसवणूक करून जमीन लुबाडणाऱ्या धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; शेतकऱ्यांनी धरले धरणे आंदोलन
-विराट कोहली म्हणतो, ‘या’ कारणामुळे काल भारताचा पराभव झाला!
-‘मी राजीनामा देणार म्हणजे देणार’; काँग्रेसमध्ये हालचालींना वेग
-नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात; खासदाराचे बेताल वक्तव्य
Comments are closed.