बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज आणि पाणी पुरवणं होय”

नवी दिल्ली | अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत. यावर बोलताना आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज आणि पाणी देणं हीच खरी देशभक्ती असल्याचं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

जे कामाला पसंती देतात तेच खरे देशभक्त असतात. सरकारचं काम लोकांच्या जीवनात सुधारणा करणं आहे, लोकांना मदत करणं आहे, नागरिकांच्या कुटुंबांना समृद्ध बनवणं आहे, असा टोला सिसोदिया यांनी भाजपला लगावला आहे.

दिल्लीच्या जनतेनं अपेक्षेपेक्षा जास्त सन्मान आम्हाला दिलाय, आमच्या कामाचा सन्मान केलाय. द्वेषाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी झुगारून प्रेम आणि स्नेहाचं राजकारण स्विकारलंय, असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने मोठा विजय मिळवला. आपपनं 62 जागांवर विजय मिळवलेला आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“बजरंगबलीमुळे जिंकलात, आता शाळेत-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा”

BSNLचा धमाका; 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा

महत्वाच्या बातम्या- 

“अरे बंगल्यांवर उधळपट्टी कशाला करताय, बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात”

…म्हणून रितेश-जेनेलिया घेणार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची पत्नीसह भेट!

शाहरूख खानसोबत तुलना म्हणजे सन्मानाची गोष्ट- कार्तिक आर्यन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More