बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय’, अमृता फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्यावरून सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेना आमदारांनी पलटवार केला आहे. अनिल देशमुखांवर वसूलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयात वारंवार बोलवुनही गैरहजर राहिले त्यानंतर त्यांना लुकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.

परंतु, अनिल देशमुख हे सध्या कुठे आहेत हे कुणालाही माहित नसल्याने त्यांच्या गायब असण्यावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. अनिल देशमुख आणि परमबीर सिंह हे काय हनीमूनला गेले की काय?, असा प्रश्न काल अमृता फडणवीसांनी विचारला होता. त्यावर आता शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी प्रतिहल्ला चढवत अमृतावहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय म्हणून त्या अस्वस्थ आहेत, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

‘अनिल देशमुख सापडत नाहीत, तर तुमच्याकडे तपास यंत्रणा आहेत ना तुम्ही शोधु शकता’, असा खोचक टोलाही मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सामनामधून भाजपवर टीका झाली की, अमृता फडणवीस लगेच अस्वस्थ होतात. त्यांना आमदार आणि भाजपच्या प्रवक्ता व्हायचंय म्हणून त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत’, असा सणसणीत टोला लगावत मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

थोडक्यात बातम्या

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने वसूल केला तब्बल एवढ्या कोटींचा दंड

SBI नंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेला RBI चा दणका; केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं’, धनंजय मुंडेंनी सांगितली मन की बात

“शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More