बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या अग्रलेखातून बीफच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर पलटवार केला.

सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय. मागील 2 वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहिती आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. आता त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांची नेमकी पोटदुखी काय आहे ? असं आहे की, चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणून त्या शिवसेनेवर आगपाखड करतायेत, असं मनिषा कायंदे म्हणाल्यात.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी आपलं काहीतरी झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा हा आटापिटा चालला आहे, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“संसदेतील गोंधळाचं खापर विरोधकांवर फोडून तुमच्या त्या लोकशाहीचं श्राद्धच घाला”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

मोठी बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत पुन्हा बदल

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More