बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोपीचंद पडळकर बांडगुळ आहे आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. नुकतंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ओबीसी आरक्षणावरून गंभीर टीका केली होती. आता शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी पडळकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केव्हाच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. त्यांनी केव्हाच जातीचं राजकारण केलं नाही. पडळकरांना असं वाटतं की, मोठ्या माणसांची नावं घेतली की, नाव मोठं होतं. मात्र, पडळकर हे बांडगुळ आहे आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी गंभीर टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही. हे खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला, अशी बोचरी टीका पडळकर यांनी संजय राऊतांवर केली होती.

यापुर्वी संजय राऊत यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन फडणवीसांवर टीका केली होती.  फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

पालकांसाठी खुशखबर! लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ‘या’ लसीच्या चाचणीला लवकरच होणार सुरुवात

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

महाराष्ट्रात उद्यापासून नवे निर्बंध लागू; काय सुरू?, काय बंद?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

’40 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार’

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More