नरेंद्र मोदी नीच माणूस, मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली

नवी दिल्ली | काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना उद्देशून नीच शब्द वापरला, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनींही त्यांच्या शब्दाचा निषेध करत माफीची अपेक्षा व्यक्त केलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंचं मोठं योगदान होतं. त्यांच्या कुटुंबाबद्दल घाणेरडी वक्तव्य केली जातात. मला वाटतं ही व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहेत. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही, असं वक्तव्य मणिशंकर यांनी केलं होतं.

उच्च-नीच हे देशाचे संस्कार नाहीत, मी भलेही खालच्या जातीतला असेन मात्र काम उच्च आहे, असं प्रत्युत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी माफीनामा दिला आहे.