बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2027 ला मानवजात नष्ट होणार?’; ‘या’ व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर झेवियर नावाच्या एका व्यक्तीने 2027 रोजी मानवजात नष्ट होणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्याने लोकांना एक धक्कादायक बाब सांगितली आहे. त्याच्या या गोष्टींनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

झेवियरने सांगितल्याप्रमाणे तो 2027 मधला असून टाईम ट्रॅव्हल करुन 2021 मध्ये आला आहे. त्याने टिकटाॅकवर अकाऊंट काढून लोकांना माणसं नसलेलं एक शहर दाखवलं आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

त्याने केलेल्या दाव्यानुसार 2027 साली मानवजात नष्ट झाली तरी या पृथ्वीवर राहणारा तो एकमेव माणूस असेल. तसेच व्हिडीओमध्ये त्याने त्याचा पृथ्वीवर 219 वा दिवस असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, झेवियरने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनेकांना झेवियरवर विश्वास असल्याचं दिसून येतं. तर अनेकांनी तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करत असल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांनी नाही तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपासला- रामदास आठवले

मोठी बातमी! IPL पुन्हा थांबवणार??? ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित

“56 वाल्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर 119 वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”

बाॅयफ्रेंड तुझा की माझा?, तरुणींचा मॉलमध्ये राडा, पाहा व्हिडीओ

रस्त्यावर उभं राहत मुंबईतील पठ्ठ्यानं केलं असं काही की…, व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More