बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युपीएच्या काळात तब्बल 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले पण आम्ही कधी राजकारण केलं नाही- काँग्रेस

नवी दिल्ली | युपीए सरकारच्या काळातही तब्बल 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. पण त्याचा वापर आम्ही मतांसाठी  केला नाही, असं म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मोदी सरकार आर्थिक स्तरावर अपयशी ठरलं आहे त्यांच हे अपयश लपवण्यासाठी ते लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून ही लाजिरवाणी बाब आहे, असा घणाघात मनमोहन सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस सरकारने 26/11च्या हल्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आरोपाशी मी सहमत नाही, असं मनमोहन सिंह म्हणाले.

प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही दहशदवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणण्याची भूमिका घेतली होती, असंही मनमोहन सिंह यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-केरळमध्ये मुस्लिम शिक्षण संस्थेकडून शाळा, महाविद्यालयात बुरखा बंदी!

-दुष्काळाबाबतचा आमच्याकडे संपूर्ण प्लॅन तयार- देवेंद्र फडणवीस

-मोदींच्या ‘त्या’ मित्रानं मसूद, दाऊद आणि हाफिजला भारताकडे सोपवावं- दिग्विजय सिंह

-बलात्कारप्रकरणी ‘या’ क्रिकेटपटूला 5 वर्षांची शिक्षा

-उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच मी ‘ती’ भूमिका मांडली- निलम गोऱ्हे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More