मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते दादरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मनोहर जोशींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या ‘प्रशासन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.

एका ठराविक वयानंतर आपण माणूस म्हणून शारीरिकरित्या कोसळतो. अशावेळी आपल्या मागे असलेल्या लोकांना रोखून धरणे योग्य नसल्याचं मनोहर जोशी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जोशी यांच्या या मागणीवर भाष्य केलं. सरांसारखी व्यक्ती निवृत्त होऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!

-राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली; उत्तर भारतीयांना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन सुनावलं!

-“…असं वाटतंय या सभागृहात कोणी वाघ आलाय”