टीव्ही अँकरच्या एका अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक!

पणजी | टीव्ही अँकरच्या एका अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक केलं, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलाय. गोव्यात उद्योजकांच्या एका मेळाव्यापूर्वी ते बोलत होते.

८ जून २०१५ रोजी ईशान्य भारतात पहिलं सर्जिकल स्ट्राईक केलं. तेव्हा “असंच ऑपरेशन पश्चिमेत करण्याची तुमच्यात हिंमत आहे का?, असा प्रश्न एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना विचारला.

मी हा प्रश्न तेव्हाच ऐकला होता. मात्र योग्य वेळ आल्यावर त्याला उत्तर द्यायचं ठरवलं होतं, असं पर्रिकर म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या