‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग

‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग

नवी दिल्ली | भाजपने ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ ही मोहिम सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेत हातात झेंडा घेतलेला फोटो शेअर केला आहे.

मनोहर पर्रिकर सध्या कॅन्सरशी लढत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या नाकात ट्युब असतानाही त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग घेत सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला.

त्यांनी शेअर केलेल्या फोटोत पर्रिकरांचा मुलगा आणि सूनही दिसत आहे. ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या मोहिमेतून भाजप पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा संकल्प करणार आहे.

दरम्यान, आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला सुरूवात केली आहे. ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमाने भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

राजनाथ सिंहांनी नाकारला सोन्याचा मुकुट, म्हणाले…

-जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

मतदारांसमोर हात जोडून-झुकून जा, विरोधकांसमोर ठोकून जा- आशिष शेलार

-कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत; स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं! 

Google+ Linkedin