देश

5 मिनिटांच्या भेटीत राफेलवर एकदाही चर्चा झाली नाही; मनोहर पर्रिकरांनी लिहलं पत्र

पणजी | आपण फक्त 5 मिनिटं भेटलो या भेटीमध्ये राफेलवर एकदाही चर्चा झाली नसताना तुम्ही मात्र त्या भेटीचा वापर राजकारणासाठी करत आहात, अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधींना पत्र लिहलं आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली होती.

माझा नव्या राफेल करारामध्ये काहीही संबंध नाही, नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींना फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला, असं मनोहर पर्रिकर यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केरळ मधील सभेत बोलताना केला होता.

तुम्ही मला कोणतीही पूर्वसूचना न देता मला भेटलात आणि माझ्या प्रकृतीबाबत विचारणा केलीत याचं मी स्वागत करतो, पण माध्यमात आलेली आपली विधानं वाचून धक्का बसल्याचं मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकर यांना भेटल्यानंतर ती भेट खासगी स्वरुपाची होती, असं ट्विट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या

पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

-महाआघाडीची सत्ता आल्यास दररोज पंतप्रधान बदलला जाईल- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या