बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसं उत्तर द्या- मनोहरलाल खट्टर

नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप यावर कोणताही तोडगा काढला नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकऱ्यांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. विरोधकांनी मनोहरलाल खट्टर यांच्यावर आक्रमक होत टीका केली आहे.

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसं उत्तर द्या, असं आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. चंदीगडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना खट्टर यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी खट्टर सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. आम्हीही पाहून घेऊ. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असं मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राज्याचा मुख्यमंत्री हिंसाचाराला प्रोत्साहन देत असेल, कायदा-सुव्यवस्था समाप्त करण्याची गोष्ट करत असेल, तर संविधानानुसार शासन कसं चालणार?, असा सवाल त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

“हा मोदींचा नवीन भारत आहे, इथे गुन्हेगारांना दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो”

आर्यन खानने ‘या’ ठिकाणी लपवले होते ड्रग्ज; धक्कादायक माहिती समोर

‘या’ कारणामुळे प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी सलमान धावला, रात्री उशिरा मन्नतवर पोहोचला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More