मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा?

Manoj Jarange l गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा पॅटर्न राबविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

जरांगे पाटील पुढील रणनीतीची घोषणा करणार :

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगेसोयरे हा अध्यादेश लागू करावा, तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे व कुणबी म्हणून प्रमाणपत्रे देण्यास मदत करावी अशा मागण्या केल्या आहेत. याशिवाय येत्या शनिवारी म्हणजेच दसऱ्याला नारायण गडावर मनोज जरांगे पाटील मेळावा देखील घेणार आहेत. त्यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या पुढील रणनीतीची घोषणा देखील करणार आहेत.

आता मराठा समाज निवडणूकीच्या माध्यमातून एकजूट देखील दाखविणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील आता विधानसभा निवडणुकीला आपले उमेदवार देखील उभे करणार की नाही याविषयी उत्सुकता असताना ठाण्यात मात्र मराठा क्रांती मोर्चाने मराठा पॅटर्न राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Manoj Jarange l जरांगे पाटील सर्व पक्षांना कोंडीत पकडणार :

राज्यातील मराठा समाजाबाबत सर्वच राजकीय पक्षांची उदासिनता पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या विधानसभास निवडणुकीत मराठा एकजुटीची ताकद दाखविण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकी़त मराठा क्रांती मोर्चाने “मराठा पॅटर्न”राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

याशिवाय ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” राबवणार असल्याची माहिती देखील ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी दिली आहे.

News Title – Manoj jarange aginst on eknath shinde

महत्त्वाच्या बातम्या-

“शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी स्वत:ची पोरं काॅन्व्हेन्टमध्ये..”; किरण माने यांची पोस्ट चर्चेत

शिंदे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

ऐन दिवाळीत शनीची वक्री चाल, ‘या’ 3 राशींचे सुरू होणार अच्छे दिन!

‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही

आज नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाता ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!