आता सुट्टी नाहीच; मनोज जरांगेंनी कोणाला केलं टार्गेट?

Manoj Jarange l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशातच आता यंदाच्या विधानसभेत मतदार राजा कोणाला कौल देणार हे मात्र 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.

मराठवाड्यातील 22 मतदारसंघात टफ फाईट होणार? :

राज्यातील बदलेल्या राजकारणामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. कारण राज्यातील काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मराठवाड्यातील तब्ब्ल 22 मतदारसंघात टफ फाईट दिसून येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात नवीन चेहऱ्यांच्या मांदियाळीत दिग्गज नेत्यांना फटका बसू शकतो. कारण लोकसभा निवडणुकी प्रमाणेच राज्यातील काही मतदारसंघात नवीन उमेदवार जायंट किलर ठरण्याची शल्यता आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Manoj Jarange l जरांगे पाटलांचा महायुतीला थेट इशारा :

याशिवाय मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी फिल्डिंग लावली आहे. तर लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले मनोज जरांगे पाटील देखील बाजी पलटवणार असल्याचा इशारा देत आहेत.

अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी आता सुट्टी नाहीच म्हणत महायुती सरकारला आणि विशेषतः भाजपला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता मराठवाडा राज्याच्या राजकारणाची दिशा पालटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे लोकसभेप्रमाणेच आताही विधानसभेत जरांगे फॅक्टर लागू करण्याच्या तयारीत आहेत.

News Title : Manoj jarange aginst on mahayuti

महत्वाच्या बातम्या –

‘या’ मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना भिडणार?

लवकरच Mini Fortuner कार बाजारात धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत?

दिवाळीला अयोध्येत घ्या रामलल्लाचं दर्शन; सर्वात स्वस्तातलं टूर पॅकेज मिळेल ‘इथे’

ठरलं! अजित पवार बारामतीतून लढणार, NCP ची पहिली यादी जाहीर

अजित पवारांविरोधात ‘हा’ युवा नेता मैदानात उतरणार?