Manoj Jarange l विधानसभा निवडणूक जवळ येताच पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांचे लक्ष आता भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर आहे. अगदी थोड्या दिवसात ते बी येडं होतं की काय? तसेच ते बी बधिर होतं काय? अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर केली आहे.
तुम्ही मराठा आरक्षण द्या, मग तुम्हाला फायदा होईल :
याप्रकरणी मनोज जरांगे म्हणाले की, तुम्हाला जर राज्यातील 50 ते 55% मराठा विरोधात जाऊ द्यायचे नसतील तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. कारण मराठे दादागिरीला मोजत नाहीत, त्यामुळे सगळ्यांची दादागिरी मोडीत काढणार आहे. सध्या महाविकास आघाडी सत्तेत नाही. त्यामुळे त्यांना कुठून आरक्षण मागाणार? तसेच त्यांना प्रश्न देखील काय विचारणार? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय लोकांची आशा तुमच्याकडून आहे. तुम्ही आरक्षण द्या, मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा झाला, कारण तुम्ही आरक्षण दिले नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला सुनावले आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात माझं एकच म्हणणं आहे की, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या तर मराठे देखील तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, तुम्ही नाही दिलं की खेळ खल्लास करतील असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange l महायुतीने हे का केले नाही?
मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयऱ्याची आधी सूचना काढली पण मात्र अंमलबजावणी का केली नाही? तसेच सरसकट राज्यातील गुन्हे मागे घेऊ म्हटले होते पण ते का घेतले नाही? त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत आपण का देत नाहीत.? याशिवाय ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या का थांबून ठेवल्यात? व याप्रकरणी एसआयटी का नेमली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
याशिवाय बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना नोकऱ्या का दिला नाहीत?, ईडब्लूएस मराठ्याचे का रद्द केले?, शिंदे समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती का काम करत नाही? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अद्यापही का झाला नाही? तसेच कोपर्डी घटनेच्या आरोपीला अजून फाशी का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे महायुती सरकारने द्यावी असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
News Title – Manoj Jarange Aginst On Prasad Lad
महत्त्वाच्या बातम्या-
… तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा; ‘या’ नेत्याचं आवाहन
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करणार?
मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; मिळाली धक्कादायक माहिती