ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange l राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला गाजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासंदर्भात मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.सरकारने घेतलेली बैठक ही पूर्णपणे मॅनेज केलेली बैठक होती असं वक्तव्य मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटलांनी प्रश्न केला उपस्थित? :

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्रांची चौकशी होणार असेल तर मंडल आयोगाने दिलेलं १४ टक्के आरक्षण देखील घालवलं पाहिजे. तसेच वरचं तर बोगस आहेच. त्यामध्ये काही दुमत नाही. तसेच मराठे त्याबद्दल गप्प आहेत. त्याच्यावरचं १६ टक्के आरक्षण बोगस असतं, सरकार एका बाजूने बोलणारं नसेल तर दूध का दूध आणि पानी का पानी केलं जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

याशिवाय १४ टक्क्यांचं आरक्षण १६ टक्के आणि त्यानंतर ५२ टक्के कसं झालं? तसेच १४ टक्के आरक्षण देखील रद्द करा हीपण आमची मागणी आहे. मंडल आयोगाने आरक्षण दिलं तेव्हा सर्व्हे, जातनिहाय जनगणना सगळं केलं असणारच. ओबीसींची यादीही तयार असेल. जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजांची केली. मात्र जर खोटं असेल तर ते १४ टक्के आरक्षण देखील रद्द झालं पाहिजे. इंग्रजांची जनगणना खरी आणि आमची १८८४ च्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या असं कसं चालेल?” असा रोखठोक प्रश्न मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे.

Manoj Jarange l सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीत ओबीसी बांधवांचाही फायदा होणार :

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणले की, छगन भुजबळचं काय बोलायचं? तो काहीही रद्द करा म्हणत आहे. त्याने सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या आहेत. तो म्हणतोय रद्द करा हा जातीयवाद नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीत ओबीसी बांधवांचाही फायदा होणार आहे. ते तो रद्द करा म्हणतोय. याची मागणीच अशी असते ज्यात काही तथ्य नसत.

मराठ्यांचं वाटोळं होईल अशी त्याची म्हणजेच छगन भुजबळ यांची एक तरी मागणी असतेच. मराठ्यांच्या मागण्यांना विरोध करायचा हा भुजबळांचा सध्यातरी धंदाच झाला आहे अशी खरमरीत टीका मनोज जरांगेंनी केली आहे.

News Title – Manoj Jarange Patil Aginst On State Goverment

महत्त्वाच्या बातम्या

ओबीसींसाठी महत्वाचा दिवस; लक्ष्मण हाकेंच्या भेटीला ‘हे’ मोठे मंत्री जाणार

या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा…

लक्ष्मण हाकेंचं उदाहरण देत पंकजा मुंडेंचा जरांगेंना टोला, म्हणाल्या…

लक्ष्मण हाकेंनी काढली मनोज जरांगेंची लायकी, म्हणाले…

‘मी त्या जातीतली…’; मराठी सिनेसृष्टीबाबत माधुरी पवारने केला धक्कादायक खुलासा