Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.राज्यात भुजबळ हेच दंगली घडवणार असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. आज (10 जुलै) ते माध्यमांशी संवाद साधत होते.
फडणवीस यांच्या सरकारमध्ये भुजबळ आहेत. ते जातीयवाद करत असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्यात मराठा आणि ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. पण, छगन भुजबळ हे राज्य पेटवायला निघाले आहेत, असा थेट आरोपच जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांच्यावर टीका
“माझ्याविरोधात भुजबळ यांनी सगळे ओबीसी नेते उभे केले आहेत.छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे मराठ्यांना लक्ष्य करत आहेत. आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना बघायला आलो नाहीत. हे फक्त वेळ मारून नेत आहेत.”, अशी टीका जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारवर केली.
तसंच पुढे त्यांनी “आम्ही कोणाच्या फायद्यासाठी काम करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे. आम्ही आमची शक्ती दाखवतो.”, असा इशारा देखील राज्य सरकारला दिला.
जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
पुढे जरांगे यांनी बीडमध्ये होणाऱ्या सभेबद्दल देखील भाष्य केलं. बीडमध्ये सभेला परवानगी नाकारण्यात आलीये, असे संदेश आले आहेत. पण, धनंजय मुंडे यांनी तसं काही नाही, असं म्हटलंय. त्यामुळे कुणीतरी अफवा पसरवत आहे. त्यांना आवरा, असंही जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. आता याला भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष राहील.
News Title – Manoj Jarange Allegation on Chhagan Bhujbal
महत्त्वाच्या बातम्या-
कार खरेदी करायचीयं? तर येत्या काळात तुमच्यासमोर आहेत ‘हे’ बेस्ट ऑप्शन
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
आज ‘या’ 2 राशींचे नशीब पालटणार!
टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच; ‘या’ माजी खेळाडूवर टाकली संघाची जबाबदारी
टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील ‘या’ खेळाडूला मिळणार घर आणि सरकारी नोकरी!