मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम

Manoj Jarange | सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे.  राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई (Shambhujraj Desai) आणि संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली.

यावेळी दोन्ही नेत्यांनी जरांगे यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तसंच मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही सरकारला 2 महिन्यांचा अवधी द्यायला हवा, अशी मागणी देखील यावेळी देसाई यांनी केली. त्यावर जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला आहे. त्यांनी आपलं उपोषण आज स्थगित केल्याची घोषणा केली. तसेच, पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरू, असा इशारा देखील जरांगे(Manoj Jarange) यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

या घोषणेनंतर सरकारकडून आलेले मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्युस पाजून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं. यावेळी उपस्थित जनसमूहाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, जरांगे यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

सगे सोयरेची व्याख्या आहे, त्याप्रमाणेच हवी, समाजला फटका बसायला नको. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा कायदा पारित करायला हरकत नाही. सरकारने हैद्राबाद गॅजेट लागू करावे, सातारा संस्थान मुंबई गॅजेट लागू करावे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. तसंच, नोंदी सापडल्या आहेत पण काही अधिकारी सर्टिफिकेट देत नाहीत. त्यानंतर, व्हेरिफिकेशन देत नाहीत. त्यामुळे, त्यांना मार्ग खुला करावा अशी मागणीही जरांगे (Manoj Jarange) यांनी केली.

राज्य सरकारला 14 जुलैपर्यंत वेळ, त्यांनंतर..

दरम्यान, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत 1 महिन्याची मुदत दिली आहे. 1 महिन्याच्या आत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर निवडणूक लढवणार. 1 महिना देण्यास आम्ही तयार आहोत, त्यानंतर काही म्हणू नका. वेळ आली तर विधानसभेला जागेवर सीट उभा नाही करणार, तर नावं घेऊन उमेदवार पाडणार, असा इशाराच जरांगे(Manoj Jarange)  यांनी दिला आहे.

एक महिन्यात सरकारने आरक्षणासंदर्भातील निर्णय दिला नाही तर मराठे ऐकणार नाहीत.त्यानंतर 14 जुलैला सरकारचा एक शब्दही ऐकणार नाही, असंही जरांगे म्हणाले आहेत. दुसरीकडे, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. मित्र म्हणून माझं ऐका. तुमचे प्रतिनिधी पाठवा, त्यांचे नाव सांगा, आपण बैठक मुख्यमंत्र्यांकडे लावू, असं आश्वासन शंभूराज देसाईंनी मनोज जरागेंना दिलंय.

News Title- Manoj Jarange Announced Suspension Of Hunger Strike

महत्त्वाच्या बातम्या-

‘एक जण राजीनामा देतोय तर त्याचा…’; केतकी चितळेनं काढलं महायुती सरकारचं वाभाडं

कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर अखेर करणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग, लोक आता मनसेची वाट बघतायेत”

नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं

गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..