Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आता 4 जूनरोजी लागणार आहे. याच दिवशी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
इतकंच नाही तर, विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. मराठा समाजाच्या सरसकट कुणबीत समावेशासाठी जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांनी पुन्हा मोठी भूमिका घेतली आहे.
जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार
यावेळी त्यांनी अनेकांना इशारा देखील दिला आहे. जरांगे पाटील यांनी यावर्षाच्या सुरुवातीला आणि मागच्या वर्षी केलेल्या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांना हादरवून सोडलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी एल्गार पुकारलाय.
आज (31 मे) जरांगे पाटील (Manoj Jarange ) पुण्यातील कोर्टात हजर झाले होते. 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आलं होतं. त्यांच्याविरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठी घोषणा केली.
“..तर, विधानसभेच्या रिंगणात 288 उमेदवार उभे करू”
“सगे सोयरे अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर, विधानसभेच्या रिंगणात 288 उमेदवार उभे करणार.”, अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांनी केली आहे. यासोबतच 4 जूनपासून त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे.
4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. याच दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. यामुळे राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. यावेळी जरांगे यांनी नाव न घेता राजकीय नेत्यांवर देखील मोठं भाष्य केलं.
News Title – Manoj Jarange announced to contest assembly elections
महत्वाच्या बातम्या-
अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांसाठी असणार खास ‘ड्रेसकोड’; लग्नपत्रिका आली समोर
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने घेतला मोठा निर्णय!
पुणे अपघाताला नवं वळण; आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा
‘सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तरी…’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
पुणे अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर, त्या रात्री विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरेंना…