मतदानाच्या दिवशी जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना मोठं आवाहन; म्हणाले..

manoj jarange

Manoj Jarange | विधानसभा निवडणुकांसाठी आज राज्यातील 288 मतदारसंघात मतदान होत आहे. आज सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मोठं आवाहन केलं आहे. मतदानाच्या दिवशी नेमकं कोणाला मतदान करायचं याबाबत त्यांनी आवाहन केलंय. (Manoj Jarange )

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुम्ही मालक आहात. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधलं नाही. त्यामुळे तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचे ते करा.आपल्या लेकराच्या बाजूने, आरक्षणाच्या बाजूने मतदान करा, असं जरांगे म्हणाले आहेत.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुमच्या मनाने तुम्हाला जे करायचे ते करा. मालक तुम्ही आहात, असंही जरांगे म्हणाले. मी कोणाजवळ फोटो काढला म्हणून मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच मी कोणत्याही ठिकाणी टीम पाठवली नसल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही भाष्य केलं. “त्याला हिंदू धर्माशी देणे घेणे नाही. तो राजकीय दलाल आहे त्याला हिंदूंची गरज नाही, हिंदूंच्या फोटोची गरज नाही.”, असं जरांगे म्हणाले आहेत. ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी जरांगे (Manoj Jarange ) यांनी मराठा बांधवांना मतदान करण्याचा हक्क बजावा असे आवाहन केले.

कालीचरण महाराजांनाही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, कालीचरण महाराजांनी एका सभेत जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. “आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस,” अशा शब्दांत कालीचरण महाराजांनी जरांगे (Manoj Jarange )यांच्यावर टीका केली होती.

News Title :  Manoj Jarange appeal to the Maratha voters 

महत्वाच्या बातम्या –

‘विनोद तावडे निर्दोष, त्यांच्याकडे कोणताही पैसा सापडला नाही..’; फडणवीस स्पष्टच बोलले

विनोद तावडेंच्या डायरी संबंधित नव्या दाव्यानं राजकारणात पुन्हा खळबळ!

शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!

ऐन निवडणुकीत भाजपचा सुप्रिया सुळेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .