Manoj Jarange | राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलीये. त्यांनी यासाठी अनेकदा उपोषण देखील केलं आहे. तर, सरकारने अजूनही याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवरच जरांगे पाटील यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. (Manoj Jarange )
जरांगे पाटील यांनी काल 20 ऑक्टोबररोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विधानसभेबाबत मोठी घोषणा केली. सर्व जागा न लढवता जिथे ताकद आहे, तिथं अर्ज भरा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समर्थकांना केलं आहे. म्हणजेच, मनोज जरांगे पाटील यांनी देखील आता राजकारणात एंट्री केली आहे.
मनोज जरांगे यांची मोठी घोषणा
“ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच, ज्या ठिकाणी उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही. पण, त्या उमेदवाराकडून स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं.”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Manoj Jarange )
“कोणत्या मतदारसंघामधून आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, तसेच कुठे मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील आपल्याला बघायचे आहे. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मतदारसंघामधून कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणता मागे घ्यायचा? सध्या तुम्ही उमेदवारी अर्ज भरा.”, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.
विधानसभेत उमेदवार उभे करणार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी सरकारने आपली मागणी मान्य केली नाही तर विधानसभेत उमेदवार उभे करणार, असा इशारा दिला होता. तसेच सत्ताधाऱ्यांचे आमदार निवडणुकीत पाडणार, असंही ते म्हणाले होते.त्यानंतर अखेर मनोज जरांगे यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. (Manoj Jarange )
News Title : Manoj Jarange big announcement on Assembly elections
महत्वाच्या बातम्या –
शनीची चाल करणार कमाल, दिवाळीपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार!
शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर; कोणाकोणाला मिळणार संधी?
‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका
सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ घरगुती उपाय नक्की देईल आराम!
मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन